शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १९०)
दि. २० ऑक्टोबर २०२० वार - मंगळवार
आजचा विषय - परिसर अभ्यास १ / स्पोकन इंग्लिश / विज्ञान
इयत्ता - पहिली व दुसरी
पाठ - Read words containing Br, Cl, St
इयत्ता - तिसरी
पाठ - स्वयंपाक घरात जाऊ या
इयत्ता - चौथी
पाठ - दिशा व नकाशा
इयत्ता - पाचवी
पाठ - आपले घर व पर्यावरण-प्रदेशानुसार घरांची रचना
इयत्ता - सहावी
पाठ - आपली अस्थिसंस्था व त्वचा- सांधा
इयत्ता - सातवी
पाठ - आपत्ती व्यवस्थापन- दुष्काळ
इयत्ता - आठवी
पाठ - आपत्ती व्यस्थापन- भूकंपाची कारणे
इयत्ता - नववी
पाठ - पर्यावरणीय व्यवस्थापन- घनकचऱ्याचे स्रोत
इयत्ता - दहावी
पाठ - विज्ञान भाग-2, हरित ऊर्जेच्या
दिशेने-औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र
उपक्रम १७७
बालमित्रांनो, तुम्ही आईला किंवा घरातील
सदस्यांना स्टीलच्या किंवा कोणत्याही मोठ्या डब्यामध्ये पीठ, तांदूळ, साखर किंवा इतर कोणतीही वस्तू भरताना बघितले
असेलच. ते वस्तू भरताना सतत डबा हलवत वस्तू भरत असतात. तरी डबा सतत का हलवला जातो,
त्याने काय साध्य होत असेल याचा विचार करा. आवश्यकता असल्यास
पालकांशी / शिक्षकांशी बोलून त्याबद्दल जाणून घ्या.
उपक्रम १७८
बालमित्रांनो, आज घराच्या घरी आपण एक
प्रयोग करून पाहणार आहोत. एक तांब्या किंवा कलश घ्या. तांब्या किंवा कलश पूर्ण
भरेल एवढे तांदूळ आणि एक स्क्रू ड्राइवर घ्या. आता तांदूळ त्या तांब्यामध्ये किंवा
कलशामध्ये भरण्यास सुरुवात करा. भरताना तांब्या किंवा कलश सतत हलवा व तांदूळ भरा
आणि तो काटोकाट भरेल याची काळजी घ्या. आता स्क्रू ड्राइवर तांदळामध्ये टाकून तो
नियमित वर खाली करा जेणेकरून त्यातील हवा निघून जाईल आणि अशी एक वेळ येईल ज्यावेळी
तो पूर्णपणे आत घट्ट रोवला जाईल आणि त्याच्या आधारे तुम्ही तांब्या किंवा कलश हात
न लावता उचलू शकाल. आहे की नाही मजा. हो पण हे सर्व करताना घरातील मोठ्या
सदस्यांच्या देखरेखीखाली करा आणि हो, तांदूळ वाया न घालवता
तो आपण परत वापरणार आहोत यासाठी खाली पेपर अंथरून ठेवा आणि स्क्रू ड्राइवर प्रथम
स्वच्छ धुऊन घ्या. तसेच सदर प्रयोग आपण तांदूळ किंवा गहू यासोबतच का करू शकतो आणि
इतर डाळी किंवा साबुदाणे यांसोबत का नाही याचे कारण आपल्या शिक्षकांकडून जाणून
घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS